नगरपंचायतची विशेष सभा
* *💫कणकवली दि.१५-:* कणकवली नगरपंचायतच्या आजच्या विशेष सभेत 45 कोटी 96 लाख 39 हजार 354 रुपयांच्या अंदाजपत्रकासह 82 लाख 87 हजार रुपयांच्या शिल्लकी अंदाजपत्रकास आज नगरपंचायत च्या विशेष सभेत मान्यता देण्यात आली. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी 11 वाजता ऑनलाइन विशेष सभा घेण्यात आली. गतवर्षी कणकवली नगरपंचायत चे बजेट 64 कोटींचे होते.यावर्षी सुजल निर्मल अंतर्गतच्या डीपीआर चे अंदाजित 25 कोटींच्या तरतुदी ला यावर्षीच्या बजेटमध्ये वगळण्यात आले आहे. आजच्या बैठकीला सर्व विषय समिती सभापती,नगरसेवक ऑनलाइन हजर होते. शहर विकासासाठी अग्निशमन, नळयोजना दुरुस्ती, कोंडवाडा शहरातील विकासकामे, नगरपंचायत पर्यटन महोत्सव आदी हेडखाली तरतूद करण्यात आली आहे.
