मळगाव येथे १९ रोजी शिवजयंती उत्सव २०२१’ चे आयोजन…

*मळगाव येथील शिवप्रेमींच्याच्यावतीने आयोजन;शिवव्याख्याते दिगंबर पडवळ यांचे शिवचरित्रावर होणार व्याख्यान

*💫सावंतवाडी दि.१६-:* मळगाव येथील शिवप्रेमींच्याच्यावतीने शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या पटांगणावर ‘शिवजयंती उत्सव २०२१’ चे आयोजन करण्यात आले आहे. पुणे मावळ येथील शिवव्याख्याते श्री दिगंबर पडवळ यांचे शिवचरित्रावर आधारित व्याख्यान होणार आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता शिवप्रतिमेचे पूजन, १० वाजता मळगाव बाजारपेठ स्वच्छता मोहीम, दुपारी दोन वाजता शिवरॅली आणि ऐतिहासिक विषयांवर आधारित वेशभूषा स्पर्धा होणार आहेत. सायंकाळी ६ वाजता पुणे मावळ येथील शिवव्याख्याते श्री दिगंबर पडवळ यांचे शिवचरित्रावर आधारित व्याख्यान होणार आहे. या शिवजयंती उत्सवाचा मळगाव परिसरातील सर्वांनी लाभ घ्यावा तसेच शिवजयंतीसाठी देणगी देणाºयांनी नीलेश चव्हाण ९४०५५७३७३०, गुगल पे-९६०४०२८९८६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मळगाव शिवप्रेमींच्याच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page