सावंतवाडी नगरपालिका कर वाढीला स्थगिती द्या…

संजू परब;जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन…

⚡सावंतवाडी ता.२८-: नागरिकांना कोणतीही कल्पना न देता तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता सावंतवाडी पालिका प्रशासनाने वाढवलेली घरपट्टी व पाणीपट्टी अन्यकारक आहे. त्यामुळे या निर्णयाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी अशी मागणी भाजप जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आहे याबाबत त्यांनी आज जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी यांना निवेदन दिले आहे.

यावेळी, जिल्हाध्यक्ष राजन तेली भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगर आनंद नेवगी,माजी नगरसेवक मनोज नाईक आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page