शिवसेना ठाकरे गटाकडून वायरीतील विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप

⚡मालवण ता.२८-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वायरी भागातील वायरी भुतनाथ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वायरी बांध जिल्हा परिषद शाळा, देवली काळेथर जिल्हा परिषद शाळा, तारकर्ली मत्स्यव्यवसाय जिल्हा परिषद शाळा या चार शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तरे भेट स्वरूपात देण्यात आली.

यावेळी वायरी येथील वायरी भुतनाथ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सर्व मान्यवरांचे मुख्याध्यापिका श्रद्धा देऊलकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, सरपंच भगवान लुडबे, शहरप्रमुख बाबी जोगी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, सिद्धेश मांजरेकर, प्रदिप वेंगुर्लेकर, प्रवीण लुडबे, राजू मेस्त्री, नाना नाईक, शिवा माडये, आबा केळूसकर, दादा पाटकर, बाळा पाटकर, शिक्षक राजेंद्र परब, केतकी पाडगावकर, करुणा टिकम आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page