वनमंत्री संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा….

मालवण भाजपा महिला मोर्चाने पोलिसांना दिले निवेदन.

*💫मालवण दि.१६-:* परळी येथील तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात आरोप होत असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे मागणी करणारे निवेदन मालवण तालुका भाजपा महिला मोर्चाच्या वतीने पोलीस सहाय्यक निरीक्षक सचिन पाटील यांना देण्यात आले आहे. या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव पुढे आले आहे. त्यांना मंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. तसेच त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. व पीडित पुजा हीच्या कुटुंबाला न्याय मिळावा असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष लक्ष्मी पेडणेकर,जिल्हा उपाध्यक्ष रश्मी लुडबे,भाजपा महिला पदाधिकारी पूजा वेरलकर, अन्वेशा आचरेकर, बाबा परब, नगरसेवक गणेश कुशे, भाऊ सामंत, दिलीप कांबळे,निलेश बाईत, मनोज आचरेकर आणि भाजपच्या महिला पदाधिकारी उपस्थितीत होत्या.

You cannot copy content of this page