बांदा
इन्सुली डोबाशेळ येथील शिवाजी तुकाराम सावंत( वय 76) यांचे गोवा बांबोळी येथे उपचार दरम्यान शुक्रवारी सकाळी निधन झाले. मुंबई गोवा महामार्गावर इन्सुली डोबाचीशेळ येथे दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास घरी चालत जात असताना दुचाकीस्वाराने त्यांना मागून धडक दिली होती या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविले होते मात्र दुचाकीच्या धडकेत त्यांच्या दोन्ही पायांना व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते अतिदक्षता विभागात होते. उपचारांना त्यांची प्रकृती साथ देत नव्हती अखेर उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. याबाबत बांदा पोलीसात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत शिवाजी तुकाराम सावंत हे नेहमीप्रमाणे पाय मोकळे करण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर आले होते दरम्यान ते परतून घरी जात असताना सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या युवराज मारुती मिराशे रा डोबाचीशेळ यांच्या ताब्यातील ( केए22इएच 0041) या दुचाकीने जोरदार धडक दिली ही धडक एवढी मोठी होती की यात ते जोरदार रस्त्यावर आदळले तर दुचाकीने काही अंतर फरफटत नेले त्यामुळे त्यांच्या दोन्ही पायांना व डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी स्थानिकांनी लागलीच धाव घेत त्यांना उपचारासाठी हलविले मात्र उपचाराअंती त्यांचे शुक्रवारी निधन झाले याबाबतची तक्रार त्यांचा मुलगा महेंद्र शिवाजी सावंत यांनी बांदा पोलीसात दिली. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत. मयत शिवाजी सावंत हे उत्तम शेतकरी होते सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक महेंद्र सावंत यांचे वडील तर इन्सुली ग्रामपंचायत सदस्य सौ वर्षा सावंत यांचे ते सासरे होत.
इन्सुली येथील शिवाजी सावंत यांचे गोवा येथे निधन
