*विक्रांत सावंत यांच्या माध्यमातून उभादांडा गणपती मंदिरास सॅनिटायझर मशीन भेट

*💫वेंगुर्ले दि.१५-:* उभादांडा येथील गणपती मंदिरात गणेश जयंती निमित्त ग्रामस्थांच्या मागणीनुसार शिवसेनेचे सावंतवाडी वेंगुर्ला मतदार संघाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांच्या माध्यमातून सॅनिटायझर मशीन देण्यात आली आहे. जिल्हा परिषद माजी सदस्य सुकन्या नरसुले, ग्रामपंचायत सदस्य गणेश चेंदवणकर व विभाग प्रमुख कार्मीस आल्मेडा यांनी विक्रांत सावंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यावेळी गणपती मंदिर देवस्थानचे अध्यक्ष विनायक तांडेल, प्रसाद तांडेल, संजू अनसुरकर, नेत्रा तांडेल, रमा तांडेल, ज्ञानेश्वर वस्त यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आहे. यावेळी सर्व ग्रामस्थांनी विक्रांत सावंत यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page