दिगशी गावात शिवजयंती उत्साहात

शिवाप्रेरीत युवा संघटना दिक्षीचा पुढाकार

*वैभववाडी संजय शेळके
तालुक्यातील दिगशी गावात दरवर्षी शिवजयंती जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याही वर्षी शिवप्रेरित युवा संघटनाा दिक्षी यांच्या आयोजनातून शिवजयंती जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला सकाळी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी शालांता स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
*तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच,सदस्य यांच्या मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात .
*इयत्ता दहावी व इयत्ता बारावी या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात देण्यात आल्या.
*सायंकाळी चार वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी जवळपास दीडशे महिला हळदीकुंकू साठी उपस्थित होत्या त्यानंतर महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा व तळ्यात मळ्यात कार्यक्रम तसेच मुलींसाठी देखील विविध खेळ ठेवण्यात आले होते.
*संगीत खुर्चीच्या स्पर्धेत पैठणीच्या मानकरी ठरल्या अनुश्री धुरी, दुसरा क्रमांक सायली धुरी आणि तिसरा क्रमांक पल्लवी मोरे यांनी बक्षीसे जिंकली.
*तळ्यात मळ्यात कार्यक्रम खूप रंगतदार झाला यामध्ये विजयी ठरल्या दूर्वा पाष्टे तर दुसरा क्रमांक अनुश्री धुरी व तिसरा क्रमांक समीक्षा शिवगण . *मुलामुलींसाठी अनेक फनी स्पर्धा घेण्यात आल्या. हाताला फुगा बांधून फोडणे, पायाला फुला बांधून फोडणे, तळ्याय – मळ्यात इत्यादी.
*या स्पर्धांमध्ये पूनम मोरे ,श्रावणी पाष्टे, साक्षी धुरी ,विकिता धुरी, तेजस्वी पाटील ,रितेश सोलकर गुरुनाथ मोरे, जयेश गोरुले, स्वरा पाष्टे, कीर्ती सोलकर, स्वरा शिवगण तर लकी ड्रॉ मध्ये श्रावणी पाष्टे, साक्षी साळवी, स्वरा पाष्टे असे विजय ठरले .
*या कार्यक्रमासाठी खूप मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते खास करून महिलांची उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणात होती.
*हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणारे सर्व सहकाऱ्यांचे व आर्थिक मदत करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल धुरी यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page