आचरा येथे खुल्या वाचक स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.२२-: मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून आचरा येथील रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिरतर्फे दि. २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता खुली वाचक स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये प्रख्यात लेखक मधू मंगेश कर्णिक यांच्या कोणत्याही पुस्तकावर स्पर्धकाने १० ते १२ मिनिटे समीक्षणात्मक बोलायचे आहे.

या स्पर्धेसाठी रोख रकमेची बक्षिसे सौ. भावना रमेश मुणगेकर, मुंबई, सौ. उर्मिला सांबारी, श्री. अर्जुन बापर्डेकर यांजकडून पहिल्या ३ क्रमांकांना तर श्री. बाबाजी भिसळे व श्री. अशोक कांबळी यांजकडून २ उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील. तसेच प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रथम येणाऱ्या फक्त १० स्पर्धकांना प्रवेश असून नाव नोंदणीची अंतिम तारीख दि.२५ फेब्रुवारी २०२३ दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी ०२३६५-२४६०१७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page