प्राचार्य सुरेश पाटील; शासकीय तंत्रनिकेतनचा वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
मालवण दि प्रतिनिधी
गेले दोन वर्षे कोरोनामुळे विद्यार्थी घरातूनच इंजीनिअरिंगचे शिक्षण घेत होते आता विद्यार्थी प्रत्यक्ष कॉलेज मध्ये येऊन शिक्षण घेत असल्याने
विध्यार्थ्यांनी अभ्यास करताना थिअरी बरोबरच प्रात्यक्षिकतेवर भर ध्यावा तसेच खेळ,कला, साहित्य या सारख्या सहशैक्षणिक उपक्रमात सहभाग घेऊन कौशल्य विकास साधताना प्रगतीची शिखरे गाठावित असे प्रतिपादन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ सुरेश पाटील यांनी येथे बोलताना केले
मालवण कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतनचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. कोरोना नंतर पार पडलेल्या या वार्षिक स्नेहसंमेलनात मज्जा मस्ती बरोबरच कला आविष्काराची जोड मिळाल्याने मालवण शासकीय तंत्रनिकेतचे स्नेहसंमेलन हे यादगार बनले. या कार्यक्रमाचे उदघाटन प्राचार्य डॉ सुरेश पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी जिमखाना उपाध्यक्ष प्रा. दत्तप्रसाद गोलतकर, डॉ संजय चोपडे प्रा डॉ योगेश महाडिक, प्रा दीपक बडेकर आदींसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी जिमखाना उपाध्यक्ष प्रा. दत्तप्रसाद गोलतकर, यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले
दोन दिवस चाललेल्या या वार्षिक स्नेहसंमेलनात एकांकिका, नृत्य, मिमिक्री, गायन असे विविध कार्यक्रम पार पडले यात एकांकिका – वस्त्रहरण, व्हेन ब्रिटिश वॉज कम टू इंडिया, एक लफड एक कोड,- मालवणी गजाल, या एकांकिकानी धमाल उडविली याबरोबरच मोरया, लावणी फ्युजन, जादूची झप्पी, मालवणी वर्सेस मराठी, लावणी नटले तुमच्यासाठीत, फनी डान्स, लावणी – प्रीतीच्या झुल्यात, गायन – देखिले देखिले तुझे रूप, गोंधळ, तबला जुगलबंदी, लावणी फँटॅस्टिक, स्टँड अप कॉमेडी, चुनरी, गायन – शिवाजी महाराज, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, फणी डान्स, डिस्को गरबा, गायन – आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे, रिमिक्स. गणपती नृत्य, गायन – जिना जिना, लावणी फ्युजन, फणी डान्स रिमिक्स, गायन – अभंग, गायन – हे अपना दिल तो आवारा, लावणी फितुरी, गायन – मोहे रंग दो लाल, गायन – माऊली माऊली, लावणी रिमिक्स, गायन – वाजले कि बारा, गायन – बस एक बार तुमको, फणी डान्स, गायन – इंग्लिश गाणे, गायन – बडे अच्छे लगते हो, लावणी फँटॅस्टिक, पखवाज सोलोवादन, गायन – रॅप सॉंग, गायन – जिसे देख मेरा दिल धडका, गायन – मोह मोह के धागे, हाय चक्का, गायन – रिमिक्स सॉंग, गायन – मेरी जान तुझे, थीम – कांतारा, गायन – संदेसे आते है, लावणी प्रीतीच्या झुल्यात, लावणी अर्ध्या राती आदी कार्यक्रमांनी रंगत आणली या स्नेहसमेलनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेतील कल्चरल चॅम्पियनशिप कॉलेजच्या स्थापत्य विभागाच्या विदयार्थ्यानी पटकाविली तर स्पोर्ट चॅम्पियनशिप कॉलेजच्या इलेट्रॉनिक्स विभागाच्या विदयार्थ्यानी पटकाविली
