ब्रिगेडियर सुधीर सावंत; शेतकऱ्यांना बंदुक परवाना देण्याची मागणी शासनाकडे करणार,.
⚡सावंतवाडी ता.२१-: वन्य प्राण्यांकडुन होणारे हल्ले व शेती बागायतीचे नुकसान शासन रोखू शकत नाही तर शेतकर्यांना बंदुका परवाने द्या, अशी मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे. तर लवकरच वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानी बाबत लोक चळवळ उभी करणार असल्याची माहीती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ब्रिगेडीयर तथा शिंदे गटाचे नेते सुधीर सावंत यांनी दिली.
तर वन्य प्राण्यांबरोबर आवश्यक उपाययोजना व तरतुदी या संदर्भात लवकरच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्या जाणार आहे या अहवाला बाबत शासनाकडून शेतकरी बघा इतरांना दिलासा दिला जाणार असल्याचेही ब्रिगेडियर श्री सावंत यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानी व आल्यावर आज ब्रिगेडियर श्री सावंत यांनी पदाधिकाऱ्यांचा मिळत उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांची भेट घेतली यावेळी त्यांनी विविध विषयांवर व उपायोजनांबाबत उपवनसंरक्षक श्री रेड्डी यांचे लक्ष वेधले. याबाबत त्यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाध्यक्ष नारायण राणे, योगेश तुळसकर, किसन मांजरेकर आदी उपस्थित होते
श्री. सावंत म्हणाले, वन्य प्राण्यांपासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी बागायतदारांसह सर्वसामान्य माणूस सुध्दा मेटाकुटीला आला आहे. वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाणही तितकेच आहे त्यामुळे वन्य प्राण्यांना मनुष्यवस्तीपर्यत येण्यासाठी रोखण्यात यावे, अशी मागणी आम्ही आज उपवनसंरक्षक श्री. रेड्डी यांच्या सोबतच्या चर्चत केली. यावेळी वन्य प्राणी वस्तीत घुसू नयेत यासाठी पाणवठे नव्याने बांधण्यात यावे, जंगलात त्यांना खाद्य उपलब्ध व्हावे यासाठी “वट”सारखी झाडांची जंगलात लागवड करण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच यामागण्या पुर्ण होण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर बैठक घेवून याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
श्री सावंत पुढे म्हणाले, शासन वन्य प्राण्यांकडून होणारी नुकसानी व हल्ले रोखू शकत असल्यास त्यांनी शेतकऱ्यांना स्वसंरक्षणासाठी व शेती रक्षणासाठी बंदूक वापरण्यास परवानगी द्यावी, वर्षभरापूर्वी आपण यासंदर्भात जिल्हाधिकारी यांचे लक्षही वेधले होते मात्र आता शासन स्तरावर याबाबत पाठपुरावा करणार आहे तर दुसरीकडे वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीबाबत लोक चळवळ उभी करून शासनाचे लक्ष वेधण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
