⚡मालवण ता.२१-: श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांच्या ८६ व्या जन्मोत्सवानिमित्त श्री सद्गुरु सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन आणि डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल व प्राथमिक शाळा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने सदानंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या अंतर्गत मालवण तालुकास्तरीय विविध साहित्य-कला-क्रीडा स्पर्धां घेण्यात आल्या. विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके तर सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
यामध्ये रंगभरण, चित्रकला, निबंध, हस्ताक्षर, वक्तृत्व तसेच क्रीडा स्पर्धां संपन्न झाल्या. संपूर्ण मालवण तालुक्यामधून सुमारे ११५४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यात क्रीडा स्पर्धांमध्ये सुमारे ४५० हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. स्पर्धांचा समारोप आणि क्रीडा स्पर्धा मालवण येथील टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड मैदानावर संपन्न झाल्या. या स्पर्धांचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष विलास विष्णू झाड यांनी दीपप्रज्वलन करून व श्रीफळ वाढवून केले.
मालवण पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी उदय दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष कृष्णा बांदेकर, सचिव भालचंद्र राऊत, खजिनदार विनायक निवेकर, संचालक नामदेव प्रभू, देवदत्त माडये, मेघा सावंत, अमिता निवेकर, देवीदास खडपे तसेच हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. नंदिनी साटलकर, क्रीडा स्पर्धा संयोजक अजय शिंदे, साहित्य कला स्पर्धा संयोजक सौ. साटम, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची परब, श्री. आचार्य, आठलेकर, श्री.नाईक, सौ. शिंदे, सौ. गुळवे, सौ. गावकर, श्री. राठोड, दिनेश खोत, श्री. बाणे आदी उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सौ. नंदिनी साटलकर, अजय शिंदे, सौ. साटम यांनी मेहनत घेतली. गटशिक्षणाधिकारी संजय माने, विस्तार अधिकारी श्री. दीक्षित, सर्व केंद्रप्रमुख, सर्व मुख्याध्यापक यांच्या सहकार्याने स्पर्धा यशस्वी झाल्या त्याबद्दल त्यांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.
