ओझर रेवडी माळरानावर लागलेल्या भीषण आगीत १०० काजुसह २० आंबा कलमे जळून खाक…

मालवण (प्रतिनिधी)

मालवण तालुक्यातील ओझर रेवंडी माळरानावर काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास १०० काजू कलमे तसेच २० आंबा कलमांसह मांगर आगीत भक्ष्यस्थानी पडल्याने लाखो रुपयांची हानी झाली आहे

ओझर रेवंडी माळरानावर काल सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली या आगीत नितीन दत्ताराम कांबळी यांची १०० काजू कलमे, तर प्रदीप मिठबावकर यांची २० आंबा कलमे आणि सतीश कांबळी यांचा मांगर भक्ष्यस्थानी पडली तसेच या आगीत
गवताबरोबर अनेक छोटी मोठी झाडे जळून गेली होती. ही आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिकांच्या प्रयत्नासह मालवण नगरपालिकेच्या अंग्निशमन बंबाद्वारे पाण्याचा मारा करण्यात आला. यावेळी रेवंडीचे सरपंच अमोल वस्त यांच्यासह भावेश काबंळी, संतोष काबंळी, विकास चेदंवनकर, नरेश करलकर, प्रणय तळाशीकर, विनोद काबंळी, मिलिंद काबंळी, संजय काबंळी, लकी काबंळी, सोनाली काबंळी, जागृती काळी, प्रिती काबंळी, प्रथमेश करलकर, अमित काबंळी, प्रशांत काबंळी, प्रमोद पाटील, सुरेश गावडे, नितिन काबंळी, महेश काबंळी, सचिन मोर्वेकर यासह अन्य ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

You cannot copy content of this page