⚡मालवण ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्हा गाबीत समाज कार्यकारिणी अध्यक्षपदी चंद्रशेखर उपरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर महेंद्र पराडकर यांची सरचिटणीसपदी, तर बाबा मोंडकर यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय गाबित समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत धुरीवाडा संस्कार हॉल येथे विशेष सभा झाली. यावेळी निवडलेली उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :- उपाध्यक्ष संजय पराडकर, डॉ. प्रमोद कोळंबकर, खजिनदार- सहदेव बापर्डेकर, सहसचिव-धर्माजी आडकर, किरण कुबल, हिशेब तपासणीस- दीपक तारी, जिल्हा संघटक रवीकिरण तोरसकर स्नेहा केरकर, सदस्य- राजन गिरप, हरी खोबरेकर, मेघनाद धुरी, बाबी जोगी, रमेश तारी, अन्वय प्रभु जयंत मोंडकर , सेजल परब, श्वेता हुले, उषःकला केळुसकर.
जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून समाज बांधवांच्या सर्वागीण उत्कर्षासाठी कार्यरत असताना पक्षीय राजकारणाला थारा न देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. निवडणुकांच्या काळात समाज संघटनेचा अमुक पक्षाला अथवा अमुक उमेदवाराला पाठिंबा अशी पत्रकबाजी बिलकूल न करण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.
एप्रिल अखेरीस दांडी समुद्र किनारी आयोजित करण्यात येणाऱ्या गाबीत महोत्सवाची जय्यत तयारी करण्याच्या दृष्टीने परशुराम उपरकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राधिका कुबल, दिक्षा ढोके, दिलीप घारे, छोटू सावजी, मिथुन मालंडकर, दादा वाघ, रश्मीन रोगे, भगवान मसुरकर, किरण तोरसकर, संजय बांदेकर, लक्ष्मण तारी, सुहास पराडकर, अरविंद मोंडकर आदी उपस्थित होते.
यावेळी वेंगुर्ले नगराध्यक्ष म्हणून राजन गिरप यांनी केलेल्या कार्याचा विशेष गौरव यावेळी करण्यात आला. गिरप यांनी वेंगुर्ले गाबित समाज तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.
