⚡बांदा ता.१३-: प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात श्री रामदासनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सकाळी श्री विठ्ठल रखुमाईची नित्य पुजा झाल्यावर समर्थ श्री रामदास स्वामींच्या प्रतिमेचे पुजन होईल. दुपारी नैवेद्य व आरती होऊन महाप्रसादाला आरंभ होईल.
सायंकाळी 5.30 वाजता वारकरी संत परमपूज्य श्री रेगडे महाराज यांचा वारकरी मंडळीच्या समवेत हरिपाठ कार्यक्रम होईल. सायं 7 वाजता नित्य सायंआरती होईल. रात्री स्थानिक भजनसेवेने सोहळ्याची सांगता होईल. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री विठ्ठल मंदिर बांदाच्या वतीने करण्यात आले आहे.
