वैश्य समाज मेळाव्यात राजन तेली यांचा मंत्री केसरकर यांना टोला
⚡सावंतवाडी ता.१२-: समाजाला वेळ दिल्यानंतर तेथे थांबणे गरजेचे आहे, दरवेळी घड्याळाकडे बघून मला विमान पकडायच आहे, असे म्हणून निघून जाण्याचे थांबल पाहीजे. आम्हालाही कामे असतात. कोण रिकामटेकडा नाही, असा टोला राजन तेली यांनी मंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता लगावला.
तर राज्य सरकारमध्ये स्थान असूनही समाजासाठी फायदा करुन देता येत नाही. ही मोठी खंत असल्याची टिकाही त्यांनी केली.
