सिंधुदुर्ग गणित अध्यापक मंडळाच्या परीक्षेत विद्यामंदिर कणकवलीचे यश

⚡कणकवली ता.१०-: महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ संलग्नित सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ सिंधुदुर्ग यांचे ८ वे वार्षिक अधिवेशन अनंत कृष्ण केळकर स्कूल वाडा ता. देवगड येथे आयोजित करण्यात आले होते. यानिमित्ताने गणित अध्यापक मंडळाकडून गणित प्रज्ञा परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये विद्यामंदिर माध्य.प्रशाला कणकवली येथील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले.
यामध्ये इयत्ता पाचवी मधून १ ) कुमार : साहिल संदीप सरंगले हा जिल्ह्यात बारावा, इयत्ता सहावी मधून २ ) कुमार : वेदांत सुहास बंड जिल्ह्यात चौथा तर इयत्ता नववी मधून ३) कुमार : राजवर्धन रामचंद्र भानुसे प्रज्ञावंत झाला. वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे उपक्रमशील गणित शिक्षक जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कार संदिप नागभिडकर यांचाही सन्मान चिन्ह देऊन कार्यक्रम स्थळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन डॉ.राजश्री संदीप साळुंखे , संस्था सचिव विजयकुमार वळंजु.अध्यक्ष दत्तात्रय तवटे ,ट्रस्टी अनिलपंत डेगवेकर,तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. बी.डी. सरवदे पर्यवेक्षक पी. जे.कांबळे, जेष्ठ शिक्षक ए. व्ही. वणवे व इतर शिक्षकवृंद इत्यादींनी कौतुक केले.

You cannot copy content of this page