गोवेरी स्थळकरवाडी येथील जल जीवन योजनेच्या कामाचे भूमिपूजन

भाजप जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केले भूमिपूजन

⚡कुडाळ ता.१०-: येथील केंद्र सरकार मार्फत जल जीवन मिशन अंतर्गत घर तिथे नळ ह्या योजने अंतर्गत गोवेरी स्थळकरवाडी येथे मंजूर करण्यात आलेल्या विहिरीचे उद्घाटन भूमिपूजन समारंभ भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री रणजित जी देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी श्री रुपेश कानडे, श्री अनिल ऊर्फ बंड्या सावंत, सतीश माडये, राजू रावूळ तसेच ग्रामपंचायत गोवेरी सरपंच श्री दशरथ परब, उपसरपंच सौ स्वरा गावडे सदस्य मोहन जाधव ग्रामपंचायत कर्मचारी शरद निकम गोवेरी ग्रामस्थ उपस्थित होते.

तसेच गोलम वाडी येथील उद्घाटन श्री राजू रावूळ रुपेश कानडे अनिल ऊर्फ बंड्या सावंत, सतीश माडये यांच्या हस्ते संपन्न झाला.आणि गावातील बहुसंख्य लोक उपस्थित होते.

You cannot copy content of this page