शेठ म ग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला आकाश दर्शनचा लाभ

देवगड (प्रतिनिधी )
येथील शेठ म.ग. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी रोटरी क्लब ऑफ मँगो सीटी देवगड तर्फे आयोजित केलेल्या दोन दिवसीय आकाश दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी क्लबचे अध्यक्ष श्रीपाद पारकर , मार्गदर्शक मंदार माईणकर , शाळेच्या स्थानिय समितीच्या सदस्या डाँ. अर्चना नेने , अनुश्री पारकर , मुख्याध्यापक संजीव राऊत , पर्यवेक्षक सुनिल घस्ती आणि भूगोल विषय समितीमधील शिक्षक उपस्थित होते.
यामध्ये मालवण येथील मंदार माईणकर यांनी प्रथम पीपीटी व्दारे विद्यार्थ्यांना ग्रह ,तारे आकाशगंगा , धुमकेत , अवकाशात सोडण्यात आलेल्या कृत्रिम उपग्रह आणि दुर्बिणीची माहिती दिली.
त्यानंतर सांयकाळी ७ ते ९.३० यावेळेत दुर्बिणीच्या सहाय्याने प्रत्यक्ष आकाश दर्शनाचा अनुभव माईणकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.त्याच बरोबर लेझर च्या सहायाने आकाशातील विविध ताऱ्याची माहिती ,त्यामागील कथा नक्षत्रे आणि राशींची माहिती दिली. दोन दिवसीय या कार्यक्रमात शाळेतील जवळजवळ २५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. आकाशदर्शनाचा अनुभव रोटरी क्लब तर्फे विद्यार्थ्यांना विना मोबदला देण्यात आला. शाळेमार्फत रोटरी क्लबचे आणि मार्गदर्शक मंदार माईणकर याचे पुष्पगुच्छ देवून स्वागत व आभार मानण्यात आले.

You cannot copy content of this page