वेंगुर्ला गाबीत समाज संस्था अध्यक्षपदी दिलीप उर्फ राजन गीरप यांची निवड

⚡वेंगुर्ले ता.०७-: गाबित समाज सिंधुदुर्ग शाखा वेंगुर्ला या संस्थेच्या तालुका कार्यकारिणीची पुनर्रचना संदर्भात मांडवीखाडी येथील नेचर होम स्टे येथे घेण्यांत आलेल्या बैठकित वेंगुर्ला गाबीत समाज संस्थेच्या अध्यक्षपदी वेंगुर्ले नगरपरीषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप तर सचिव पदावर किरण कुबल यांची निवड करण्यात आली आहे.

गाबित समाज सिंधुदुर्ग, शाखा वेंगुर्ला तालुका या संस्थेची महत्त्वाची बैठक गाबित समाज सिंधुदुर्गचे जिल्हा संघटक चंद्रशेखर उपरकर यांचे अध्यक्षतेखाली मांडवी येथील नेचर होम स्टे येथे रविवार दि. 5 फेब्रुवारी रोजी पार पडली. य बैठकित गाबित समाज सिंधुदुर्ग, शाखा वेंगुर्ला तालुका या संस्थेची नुतन कार्यकारीणीची निवड एकमताने करण्यांत आली. या कार्यकारीणीत अध्यक्षपदी वेंगुर्ले नगरपरीषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, उपाध्यक्षपदी भगवान मसुरकर, सचिव पदावर किरण कुबल, सहसचिवपदी नागेश गांवकर, खजिनदारपदी जयंत मोंडकर, महिला प्रतिनिधी सौ. श्वेता हुले, ईशा मोंडकर, सदस्यपदी बाबी रेडकर, अनंत केळुस्कर, सगुण सातोस्कर, विकास आरोंदेकर यांचा समावेश आहे.
यावेळी चंद्रशेखर उपरकर यांनी अखिल भारतीय गाबित समाज महासंघ, मुंबई आणि जिल्हा संघटनेच्या कामकाजाबाबत सर्वंकष माहिती दिली. तसेच वेंगुर्ले तालुक्यातील विशेषत: किनारपट्टी भागातील सर्व गावांतील गाबीत समाज बांधवांना एकत्रित आणून संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. त्यासाठी वेंगुर्ले तालुक्यातील मच्छिमारी वसाहतीतील प्रमुख प्रतिनिधींची नियोजन बैठक येत्या शनिवार दि. 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मांडवी नेचर होम स्टे येथे घेण्याचे निश्चित करण्यात आलेली आहे.
एप्रिल महात मालवण-दांडी येथे होणाऱ्या समाज मेळाव्यास उपस्थित रहाण्याचे आवाहन
अखिल भारतीय गाबित समाज संघटनेतर्फे येत्या एप्रिल महिन्यात गाबित समाजाचा भव्य महोत्सव मालवण-दांडी येथे भरविण्यात येणार आहे. या महोत्सवामध्ये वेंगुर्ले येथून मोठया संख्येने समाज बांधवांनी सहभाग घेण्याचे आवाहन चंद्रशेखर उपरकर यांनी येथे केले आहे.

You cannot copy content of this page