ठाकरे शिवसेनेच्या राक्षसी वृत्तीचा बीमोड आई भराडीनेच केला

भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केला पलटवार

⚡मालवण ता.०६-: शिवसेना ठाकरे गटाच्या राक्षसी वृत्तीचा बिमोड आई भराडीने केलेलाच आहे. फक्त ते अजुन समजून घेता येत नाही. भराडी मातेने शिवसेना ठाकरे गटाची व्यवस्थित निर्गत लावली असून उरली सुरली निर्गत येणाऱ्या वर्षभरात लागेल, असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिला आहे.

आंगणेवाडी येथे भाजपच्या आनंद मेळाव्याच्या अयोजनावरून ठाकरे गट शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी टीका केली होती. या टिकेला भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. चिंदरकर म्हणाले, आई भराडी देवीच्या यात्रेत सभा मार्गावर काही प्रमाणात ट्राफिक जाम झालंही हे नाकरता येत नाही. पण दरवर्षी आश्वासनांची खैरात करून देवीच्या मंडपात बसून खोटी आश्वासाने देऊन सिंधुदुर्गाच्या जनतेला गाजर देऊन आमदार खासदार आणि मंत्री राक्षसी वृत्तीचे सुडाचे राजकारण केल्याचं फळ म्हणून या वेळेस सत्ता उखडून टाकली. आई भराडीच्या सभामंडपात येऊन जास्त काळ खोट पचत नाही. खोटी आश्वासने देणाऱ्यांची स्मृती भ्रष्ट झाली आहे अशी टीका धोंडी चिंदरकर यांनी केली आहे.

आज भाजप- शिंदे युतीच्या सत्तेत रस्ते चकचकित करून घेतले. पालकमंत्री यांच्याकडे माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या मागणीनुसार कामे झाली. सिंधुदुर्ग बदलतोय सिंधुदुर्ग स्थिरावतोय याचे दुखणे ठाकरे गटाला आहे. विकासाच्या दृष्टीने जिल्ह्यात खुप मागे नेलात. आता मानसिकता बदला. काम करणाऱ्यांना काम करु द्या, असे धोंडी चिंदरकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री व पालकमंत्री हे सक्षम आहेत. त्यांच्या आड मांजरी सारखे पर्यायाने सिंधुदुर्गच्या विकासाच्या आड येऊ नका. या जिल्ह्यात आता निश्चित अमूलाग्र बदल दिसेल, ठाकरे गटाने थोडं सबुरीने घ्यावे. आता फक्त मालवण कुडाळच्या आमदारांच आणि रत्नागिरी- सिंधुदुर्गच्या खासदारांचं काय होणार ते बघा. पर्यायी मार्ग शोधा. कोणा भाविकांना सभेदरम्यान वाहतूक कोंडी त्रास झाला असेल त दिलगिरी व्यक्त करतो, असेही चिंदरकर म्हणाले.

You cannot copy content of this page