⚡कणकवली ता.०६-: कणकवली तालुक्यातील पियाळी येथे भर दुपारी ऊस बागायती शेतीला आग लागली. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ऊस बागायती बरोबरच इतरही काजू कलमाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भरदुपारी आग लागल्याने व वाराही सुटल्याने आग सर्व माळरानापर्यंत भडकली होती.
दरवर्षी पियाळी येथे आग लागून ऊस बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.गेल्या वर्षीही आग लागल्याने नुकसान झाले होते.वेळोवेळी पंचनामे केले परंतु अद्याप ही कोणतीही नुकसान भरपाई न मिळाल्याने यावेळी नुकसानाची नोंदणी करावी वाटत नसल्याचे ऊस बागायत शेतकरी रविंद्र ऊर्फ बाबू घाडीगांवकर यांनी बोलताना सांगितले आहे.
पियाळी येथे ऊस बागायतीला आग; लाखो रुपयांचे नुकसान
