शिक्षक आमदार झाल्याने वैभववाडीत शिक्षकांचा जल्लोष

भाजप व बाळासाहेबांची शिवसेना युतीचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाल्याने साजरा केला आनंदोत्सव

वैभववाडी संजय शेळके
कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपा व बाळासाहेबांचे शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांचा विजय जाहीर होताच वैभववाडी भाजपच्या वतीने येथील संभाजी चौकात जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी वैभववाडी जिल्हा संयोजक प्रमोद रावराणे, भाजपा अध्यक्ष नासीर काझी, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, तालुका संयोजक सुधीर नकाशे, नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, प्राची तावडे, एस. एम.बोबडे, एस. पी. परब, प्रदीप नारकर, नापणे सरपंच प्रदीप जैतापकर, मुख्याध्यापक नादकर, संजय रावराणे, रवींद्र रावराणे, हेमंत रावराणे, बाबू माईणकर, पुंडलिक साळुंखे, अवधूत नारकर, महेश रावराणे, बबन डकरे, अर्जुन रावराणे विद्यालयाचे शिक्षक व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page