गॅस पाइपलाइनसाठी सुरू असलेली खोदाई बांदा सरपंच, उपसरपंचांनी रोखली

दोडामार्ग ते बांदा रस्त्यालगत सुरू होती खोदाई

बांदा/प्रतिनिधी
दोडामार्ग ते बांदा येथे रस्त्यालागत खोदाई करून टाकण्यात येणाऱ्या गॅस पाईपलाईनचे काम आज सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब यांच्या नेतृत्वाखाली आज सायंकाळी रोखण्यात आले. उद्या शुक्रवारी सकाळी यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
गॅस पाईपलाईनसाठी खोदाई करताना स्थानिक प्रशासनाला कोणतीही कल्पना न देता डांबरी रस्ता पूर्णपणे उखडण्यात आला आहे. याठिकाणी वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. रस्त्यालगत खोदाई करण्यात आल्याने भविष्यात पावसाळ्यात रस्ता वाहून जाण्याची शक्यता आहे. यामुळे आज सायंकाळी सरपंच श्रीमती नाईक, उपसरपंच खतीब यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत यांच्यासह विकी कदम, बाबा गाड आदिनी याठिकाणी जात ठेकेदाराला धारेवर धरले. जोपर्यंत रस्ता दुरुस्ती करण्याचे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत काम सुरु करू देणार नसल्याचा इशारा देण्यात आला. यासंदर्भात उद्या सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page