बबन साळगावकर यांचा आरोप; सेट अप बॉक्स मोफत वायफाय याबरोबरच रोजगार मेळाव्यातूनही फसवणूक
⚡सावंतवाडी ता.०२-: एका उद्योजक यांनी सावंतवाडी सुरू केलेल्या ऍडमिशन च्या नावाखाली दोन वेळा येथील युवकांची व तालुकावासियांची घोर फसवणूक केली आहे चा घणाघाती आरोप सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केला.
तर मुंबई विद्यापीठाच्या नावाखाली येथे सुरू असलेले बाळासाहेब ठाकरे प्रबोधनी सेंटर केव्हाच या ठिकाणावरून दुसरीकडे हलवण्यात आले मात्र याची भनग सुद्धा येथील जनतेला नाही, रोजगार मेळाव्याच्या नावाखाली केवळ दहा हजार रुपयांच्या नोकऱ्या 20 जणांना देऊन त्यांनी आपली पाठ ठोकून घेतली परंतु आतापर्यंत दाखवलेले सेटअप बॉक्स मोफत वायफाय आधी आम्ही त्यांचे काय झाले असा सवालाही त्यांनी उपस्थित केला.ते आज त्या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
त्यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष सुरेश भोगटे, विलास जाधव उमा वारंग उपस्थित होते.
सागावकर म्हणाले एक मराठीत तरुण उद्योजक म्हणून यांच्या बद्दल आपल्याला अभिमान आहे परंतु त्यांनी गेले कित्येक वर्ष सावंतवाडीत बस्तान ठोकून सावंतवाडीकरांची तसेच तालुका वासियांची भर फसवणूक केली आहे त्यांना या ठिकाणी कोण खेळतो हे त्यांनी जाहीर करावे अन्यथा आपण या शोधासाठी डिटेक्टिव्ह नेमणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
