⚡कणकवली ता.०२-: शेर्पे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय शेर्पे प्रशालेचे लिपिक जगदीश सावंत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने विद्यालयात त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी माध्यमिक विद्यालय शेर्पे प्रशालेचे मुख्याध्यापक हिदायत अत्तार, वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर, लिपिक राजेश तांबे, सुनीता कांबळे, अजित ठाकूर, श्रीकांत कावले, सौ पाटील, सुधाकर कुलकर्णी आदी उपस्थित होते.
जगदीश सावंत यांनी लिपिक पदावर 28 वर्षे काम केले असून त्यांना शिक्षणाची आवड असल्याकारणाने विद्यालयात आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी व इतिहास विषयाचे उत्कृष्ट अध्यापन केले आहे. त्यांनी स्वतः परीक्षक, नियमात, मुख्य नियामक, पेपर सेटर या पदावर काम केले असून सन 2016 पासून शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी सिंधुदुर्ग या पतपेढीत संचालक पदावरकार्यरत राहून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शासन दरबारी प्रयत्न केले आहेत. जगदीश सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच म्हणून जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
