राकेश नेवगी मित्रमंडळ आणि अर्चना फाऊंडेशन यांचे आयोजन
⚡सावंतवाडी ता.०१-: मुले आणि पालक यांच्यातील कमी झालेला संवाद वाढण्यासाठी राकेश नेवगी मित्र मंडळ व अर्चना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता कळसुळकर इंग्लिश स्कूल व आय.बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी येथे हितगुज मुलांशी संवाद पालकांची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहीती अर्चना घारे परब यांनी पत्रकार परिषदेत दिली दिली.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष राकेश नेवगी चित्रा देसाई ॲड सायली दुभाषी, नविद हेरेकर,
नरेश जिवणे,सिद्धेश किनळेकर आदी उपस्थित होते.
सौ घारे म्हणाल्या, आजकाल बहुतेक पालकांमध्ये आणि मुलांमध्ये जास्त संवाद होत नाही त्यामुळे एक प्रकारे घरात नेगेटिव्ह वातावरण निर्माण होते हे निगेटिव्ह वातावरण पॉझिटिव्ह करण्याच्या दृष्टीने आणि मुले आणि पालक यांच्यात संवाद वाढण्याच्या दृष्टीने प्रमुख वक्ते म्हणून नभितहेरेकर पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत यातून मुलांमध्ये वैचारिक बदल पाहायला मिळणार कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त पालक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा.
तर नविद हेरकर म्हणाले,
मुलांमध्ये होणारे वैचारिक बदल मुलांना आत्मविश्वास व अतिविश्वास यामधील अंतर सोशल मीडिया व आपल्या आयुष्य यामधील फरक मोबाईल चे शारीरिक मानसिक व स्वाभाविक दुष्परिणाम अशा विविध विषयांवर मार्गदर्शन आणि पालकांशी मुक्त संवाद साधणार आहेत.
