आपल्या काळात झाली होती मंजूरव्यापाऱ्यांची होणार पर्यायी व्यवस्था;माजी नगराध्यक्ष संजू परब यांची माहिती
⚡सावंतवाडी ता.०१-: बाजारपेठेतील भाजी मंडई ही आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आली होती. त्याचे आता लवकरच भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी या मंडईच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी तेथे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या योग्य ती सोय करण्यात यावी, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी दरम्यान श्रेय घेण्यासाठी कोणी घाई गडबडीत उद्घाटन करण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला असा त्यांनी यावेळी लगावला
तसेच दिपक केसरकर यांचा देखील या भाजी मंडई बांधण्यासाठी प्रयत्न केल्याचे देखील परब म्हणाले
