एस टी चालक अरुण कुबडे सेवानिवृत्त

देवगड आगारात पार पडला निरोप समारंभ

देवगड
देवगड आगारातील चालक अरुण अनंत कुबडे रापम देवगड आगारातून ३१ जाने. रोजी ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले त्याबद्दल त्यांचा सेवानिवृत्तीपर निरोप समारंभ देवगड आगारात पार पडला. रापम सेवेत ते १९८९ साली विजयदुर्ग आगारात चालक सेवेत रुजू होऊन त्यानंतर देवगड आगारात सेवा बजावून ते सेवा निवृत्त झाले.

या सोहळ्यास आगार व्यवस्थापक निलेश लाड स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर सहा-वाहतूक निरीक्षक लहू सरवदे ,वरिष्ठ सहाय्यक श्रीमती कुंदा गोलतकर,कनिष्ठ सहाय्यक चैत्राली मांजरे,योगेश पांचाळ,वाहतूक नियंत्रक लक्ष्मण खरात, वाहतूक नियंत्रक रवींद्र मेस्त्री, तुकाराम देवरुखकर विकास केळकर, मंगेश बापर्डेकर वाहन परीक्षक दिनकर (आण्णा) प्रभूमिराशी,सेवानिवृत्त वाहक श्री. मुद्राळे प्रदीप कुबडे,पाळी प्रमुख ब्रह्मदेव चव्हाण रोखपाल चेतन वळंजु व अन्य चालक वाहक बहु संख्येने उपस्थित होते. यावेळी आगार व्यवस्थापक निलेश लाड ,तुकाराम देवरुखकर, भांडारपाल किशोर घाडी यांनी म आपले मनोगत व्यक्त करून चालक अरुण कुबडे यांची हसतमुख प्रामाणिक आणि सौजन्यपूर्वक सेवेचा आदर्श सर्व कर्मचाऱ्यांनी घेवून आपली सेवा पार पाडावी असे सांगितले.
या सोहळ्यात चालक अरुण कुबडे यांचा रापम सन्मानचिन्ह शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन
कुटूबीयांसह विशेष सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page