नगर पालिका प्रशासनाने तात्काळ सांडपाण्याचा केला बंदोबस्त
मालवण दि प्रतिनिधी
मालवणच्या पर्यटनाचे केंद्रबिंदू असलेल्या किल्ले सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या मालवण बंदर जेटीच्या मुख्य रस्त्यावर गटारातून वाहून येणाऱ्या सांडपाण्याबाबत भाजप महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर यांच्या नेतृत्वाखाली मालवणच्या भाजप महिला आघाडीने आक्रमक होत मालवण नगरपालिका प्रशासनाने लक्ष वेधल्यानंतर प्रशासनाने पळापळ झाली नगरपालिका प्रशासनाच्या स्वच्छता विभागाने सक्शन मशीनद्वारे या पाण्याची विल्हेवाट लावत तात्पुरत्या स्वरूपात सांडपाण्याचा मार्ग बंद केल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे
दरम्यान, बंदरजेटी कडे जाणाऱ्या रस्त्यावर येणारे हे सांडपाणी कायमस्वरूपी बंद न केल्यास भाजप महिला आघाडी तीव्र आंदोलन उभे करेल असा इशारा श्री पूजा करलकर यांनी दिला आहे
मालवणच्या पर्यटनाचे केंद्रबिंदू असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले सिंधुदुर्ग कडे जाणाऱ्या मालवण बंदर जेटीच्या मुख्य रस्त्यावर गटारातून मोठया प्रमाणावर सांडपाणी येत होते त्यामुळे या भागात सांडपाण्याचे तळे निर्माण झाले होते. या सांडपाण्यावर घोंगावणाऱ्या माश्या तसेच दुर्गंधी यामुळे सारे त्रस्त बनले होते या पार्श्वभूमीवर मालवणच्या भाजप महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर।यांच्या नेतृत्वाखाली भाजप मालवण शहर अध्यक्ष अन्वेशा आचरेकर, माजी नगरसेविका पूजा सरकारे, दीपाली कालमेतर आदी व इतरांनी आक्रमक होत रस्त्यावर येणारे सांडपाणी तात्काळ बंद करणेबाबत नगरपालिका स्वच्छता विभागाचे लक्ष वेधले. गेले काही दिवस पाणी कोण सोडतोय, कुठून येते, याबद्दल नगरपालिका स्वछता विभागास काहीच माहिती नसल्याचे या निमित्ताने पुढे आले असून चौकशीअंती प्रशासनाला काही नावे समजली असून त्यांना तातडीने नोटीस देणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट करीत रस्त्यावर येणारे सांडपाणी बंद करण्याबाबत कारवाई सुरू करण्यात आली.आहे
दरम्यान, येत्या सात दिवसानंतर भाजप महिला आघाडी तर्फे परत ऑन द स्पॉट पंचनामा करण्यात येणार असून रस्त्यावर येणारे कायमचे सांडपाणी बंद न झाल्यास आक्रमक भूमिका घेतली जाईल. असा इशारा पूजा करलकर यांनी दिला आहे .
