शिवसेना पदाधिकारी विशाल सावंत यांची अमित परब यांच्यावर टीका
*💫सावंतवाडी दि.१२-:* अमित परब यांनी जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्यावर टीका करण्यापेक्षा आपण स्वतः स्वार्थासाठी किती पक्ष बदलले ते जाहीर करावे. अशी टीका शिवसेना पदाधिकारी विशाल सावंत यांनी केली आहे. अमित परब यांनी नुसती टीका करून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा एकनिष्ठ राहिले असते तर नगरपरिषद निवडणुकीत तीन वेळा पराभव झाला नसता. जनता सुज्ञ असून आपल्या तत्त्वज्ञानाची गरज नाही असा प्रतिटोला शिवसेना पदाधिकारी विशाल सावंत यांनी अमित परब यांना लगावला आहे. तर अशी नाहक टीका करण्यापेक्षा नशिबाने निवडून आलेल्या ग्रामपंचायतीत विकासकामा वर लक्ष घाला अन्यथा तिथूनही हद्दपार व्हाल असा सणसणीत टोला विशाल सावंत यांनी परब यांना लगावला आहे. जनतेला सर्व काही ज्ञात असल्यानेच जनता ठामपणे शिवसेनेच्या पाठीशी उभी आहे असे ते यावेळी म्हणाले आहेत.
