जीएसटी कॉन्सिल सदस्य उमेश शर्मा : व्यापारी मेळाव्यातुन व्यापाऱ्यांना एकत्र करणे शक्य
⚡वेंगुर्ले ता.३१-: व्यापाऱ्यांना एकत्र करणे मोठी गोष्ट आहे. व्यापारी मेळाव्याने ती गोष्ट सहज शक्य होते. व्याप वाढवून किरकिरी मागे लावून घेणे याला म्हणतात व्यापारी. अच्छे दिन आयेंगे मालूम नहीं लेकींन पुराने दिन गये. हे मात्र खरे आहे. पूर्ण जगात नवीन व्यवसाय करण्यास भारतात वाव आहे. मात्र जीएसटी विषयी माहिती नसल्याने तरुणांमध्ये संभ्रम आहे. येणाऱ्या दोन वर्षात जीएसटी सुरळीत होणार, अशी ग्वाही जीएसटी कॉन्सिल सदस्य उमेश शर्मा यांनी वेंगुर्ले येथील जिल्हा व्यापारी मेळाव्यात मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
