शासनाने ई कंपनीचे धोरण जाहीर करावे

जिल्हा व्यापारी मेळाव्यात ललित गांधी यांचे आवाहन;बदल स्वीकारण्याचे व्यापाऱ्यांना केले आवाहन

⚡वेंगुर्ले ता.३१-: जिल्ह्यातील व्यापारी कधीच दुकाने बंद ठेवत नाहीत. मात्र, मेळाव्याच्या दिवशी दुकाने बंद ठेवून व्यापारी एकतेची वज्रमूठ दाखवतो. कोरोना काळात ई कॉमर्स कंपनीने भरमसाठ कमाई केली. मात्र, ई कंपनीची पॉलिसी सरकारने आधी जाहीर करावी. महाराष्ट्र चेंबर्सने ज्या मागण्या केल्या त्या अर्थसंकल्पात मंजूर व्हाव्यात. तंत्रज्ञान स्वीकारले तर व्यापारात भरभराट होईल मात्र उदासीनता डोकेदुखी ठरेल. व्यापारामध्ये तंत्रज्ञान आणणे गरजेचे आहे. महासंघाच्या माध्यमातून खरेदी एकत्र केल्यास ग्राहकांना कमी दरात वस्तू देऊ शकतो. काळानुसार बदललो नाही तर आपले अस्तित्व संपेल, असे प्रतिपादन व्यापारी मेळाव्यात बोलताना ललित गांधी यांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page