पोस्कोतील फरारी आरोपी प्रमोद परब गोव्यात जेरबंद

⚡सावंतवाडी ता.३०-: पोस्को कायद्याअंतर्गत फरार आरोपी प्रमोद मधुकर परब याला मडगाव पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. प्रमोद परब याला सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्यावतीने 24 मे 2022 ला पोस्को अंतर्गत अटक करण्यात आली होती. त्याला कोर्टासमोर हजर करून न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. त्यावेळी त्याला कोलगाव येथे क्वाॅॅरंटीन करण्यात आले होते. मात्र तेथून तो फरार झाला होता. त्याला अखेर आज मडगाव पोलिसांनी अटक केली आहे.

You cannot copy content of this page