⚡बांदा ता.३०-: मोपा विमानतळ (गोवा) पोलिसांनी ट्रक मधून होणाऱ्या बेकायदा दारूच्या वाहतुकीवर कारवाई करत १० लाख ८२ हजार १६० रुपये किमतीची ३ हजार ३३३.७२ लिटर दारू जप्त केली. बेकायदा दारूचा साठा केल्याप्रकरणी चालक विजयभाई बनाभाई चौधरी याचेवर अटकेची कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक दीपक हळणकर, पोलीस कर्मचारी उमेश विरनोडकर, प्रतिप गावकर, निनाद देऊलकर यांनी केली.
