कोकण शिक्षक मतदारसंघाच्या बांदा केंद्रावर ९४.५६ टक्के मतदान

⚡बांदा ता.३०-: कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आज बांदा केंद्रावर ९२ पैकी ८७ शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावीला. ९४.५६ टक्के मतदान झाले.

शिंदे गट भाजपा युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे व महाविकास आघाडीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांच्यात थेट लढत होत आहे. बांदा येथील खेमराज प्रशाळेच्या मतदान केंद्राबाहेर लावण्यात आलेल्या बूथवर भाजपा व शिंदे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार बाळाराम पाटील यांचा बूथ लावण्यात आला नाही.
यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, निरीक्षक किशोर शेलार, माजी सभापती प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, शीतल राऊळ, माजी सरपंच मंदार कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी मकरंद तोरसकर, गुरुनाथ सावंत, वाफोली उपसरपंच विनेश गवस, प्रवीण देसाई, शेर्ले ग्रामपंचायत सदस्य शामराव सावंत, आत्माराम गावडे, पांडुरंग नाटेकर, शिंदे गटाचे सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण राणे, भय्या गोवेकर आदी उपस्थित होते.
बांदा केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. पोलीस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले यांच्यासह याठिकाणी पोलीस फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता.

You cannot copy content of this page