कणकवली अर्बन निधी बँकेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात

⚡कणकवली ता.२९-: कणकवली अर्बन निधी लि. बँकेच्या प्रथम वर्धापन दिना निमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी प्रांताधिकारी श्रीम.वैशाली राजमाने ,तहसीलदार आर जे.पवार ,नायब तहसीलदार श्रीम.गौरी कट्टे , निवडणूक नायब तहसीलदार सौ. प्रिया हर्णे -परब ,मंडळ अधिकारी पाटील ,सल्लागार अशोक करंबेळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


पाहुण्यांच्या शुभहस्ते ,गुणवंत सेल्स एक्सिकेटीव्ह चेतन साटम,कु अस्मा पटेल,सौ. स्मिता सतीश मसुरकर , रामचंद्र दळवी,तर सर्वोत्कृष्ट सेल्स एक्सिकेटीव्ह म्हणून सौ दिव्या केणी यांचा सत्कार करण्यात आला
तसेच सर्वोत्कृष्ट गुणवंत कर्मचारी म्हणून सौ. भारती तांबे व सौ प्रांजल राणे यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी प्रांताधिकारी , तहसीलदार यांच्यासह सर्वानी बँकेच्या कामकाज विषयी समाधान व्यक्त केले.या प्रसंगी बँकेचे चेअरमन प्रा. हरिभाऊ भिसे ,व्हाईस चेअरमन डॉ. सुभाष सावंत ,ट्रेझरर प्रीतम पारकर ,सेक्रेटरी रंजन चव्हाण ,डायरेक्टर सौ.सुरेखा भिसे ,सौ प्राची पारकर , सर्वेश भिसे ,सभासद, खातेदार बहुसंख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page