शिवसेनेला धक्का; पार्सेकर यांच्या भूमिकेकडे लक्ष
⚡कणकवली ता.२९-: कणकवली तालुक्यातील शिरवल गावचे सुपुत्र उद्योजक आणि शिवसेनेचे निष्ठावान शंकर पार्सेकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वाशिम विधानसभा संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.
पक्षाचे वरिष्ठ नेते कोणतीही दखल घेत नसल्याने आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा
राजीनामा दिला देत असल्याचे म्हटले आहे.मागील 35 वर्षा पासून कट्टर शिवसैनिक, कणकवली संपर्क प्रमुख म्हणून काम केलेले बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून शंकर पार्सेकर ओळखले जात होते मात्र शिवसेनेच्या वरिष्ठ नेते मंडळींच्या मनमानी कारभाराला कंटाळून शेवटी राजीनामा देत असल्याचे ते म्हणाले शंकर पार्सेकर यांच्या राजीनाम्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
