वेत्ये येथे “क्रिकेट प्रीमियर लीग” चे शैलेश परब यांच्या हस्ते उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.२८-: श्री कलेश्वर युवा कला क्रीडा मित्रमंडळ, वेत्ये यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट प्रीमियर लीगचे उद्घाटन सावंतवाडी उद्धव बाळासाहेब ठकारे गटाचे संपर्कप्रमुख शैलेश परब यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे,उपसरपंच शितल खांबल,ग्रामपंचायत सदस्य सुनील गावडे, बाळू गावडे, स्नेहा मिठबावकर, नरेंद्र मिठबावकर, विश्राम गावकर, साई राणें, परशुराम पाटकर,संतोष गावडे, राजन आंबेकर, गौरेश गावडे, मनोज पाटकर आदी यावेळी उपस्थित होते.

या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक १५ हजार तर द्वितीय पारितोषिक १० हजार ठेवण्यात आले आहे.

You cannot copy content of this page