आ.नितेश राणे,शिवसेना नेते संदेश पारकर यांची उपस्थिती
⚡कणकवली ता.२७-: असलदे उगवतीवाडी येथे ब्राम्हणदेव सेवा मंडळाच्या वतीने श्री गणेश जयंती उत्सव , श्री सत्यनारायणाची महापुजा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.यानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भाविकांची गर्दी केली होती.आ.नितेश राणे,शिवसेना नेते संदेश पारकर, वीज वितरण कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी उपस्थिती दर्शविली.
गणेश जयंती सोहळ्यानिमित्त गणेश पुजन, सामुहिक अभिषेक, श्री सत्यनारायणाची महापुजा, महाआरती,महाप्रसाद, महिलांसाठी हळदीकुंकु समारंभ, वा.सांस्कृतिक कार्यक्रमात संगीत खुर्ची,रेकॉर्ड डान्स घेऊन सहभागी मुलांचा बक्षीस देत गौरव करण्यात आला.होम मिनिस्टर स्पर्धा पार पडली.
त्यानंतर देवगड शेवरे येथील बुवा वैभव घाडीगावकर,मिठबाव येथील बुवा सुगन डगरे यांचे सुस्वर संगीत भजन,असलदे मधलीवाडी यांचे वारकरी आणि भगवती प्रासादिक भजन मंडळ,तोरसोळे, देवगड यांचे दिंडी भजन झाल्यामुळे भाविकांचे मनोरंजन झाले.
ब्राम्हणदेव सेवा मंडळ, असलदे उगवतीवाडी यांच्या गणेश जयंती सोहळ्याला उद्योजक, समाजसेवक शेखर सोनार, आ.नितेश राणे,शिवसेना नेते संदेश पारकर,वीज वितरण कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते,माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये,असलदे सरपंच चंद्रकांत डामरे,व्हॉईस चेअरमन दयानंद हडकर,तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे,पोलीस पाटील सावित्री पाताडे,पत्रकार उमेश परब,सचिन राणे,उत्तम सावंत,माजी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके,माजी सरपंच पंढरी वायंगणकर,नांदगाव सरपंच भाई मोरजकर,कोळोशी सरपंच आचरेकर,शिवसेना उपविभाग प्रमुख तात्या निकम,हेमंत कांडर,युवा सेना उपतालुकाप्रमुख आबु मेस्त्री,माजी सरपंच दिलीप फोंडके,ग्रामपंचायत सदस्य आनंद तांबे , स्वप्ना डामरे, विद्या आचरेकर,आनंदी खरात, सुवर्णा दळवी, ग्रामसेवक आर.डी.सावंत यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते अनिल तांबे व गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
