खरेदी विक्री संघावर तज्ञ संचालक म्हणून नियुक्ती झाल्याने केला गौरव
⚡सावंतवाडी ता.२५-: आमदार आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते वैभव नाईक यांनी सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघामध्ये भाजप व शिंदे गटाची एक हाती सत्ता आहे असे असतानाही श्री नाईक यांनी या संघावर तज्ञ संचालक म्हणून निवड झालेले माजी चेअरमन अभिमन्यू लोंढे यांची भेट घेत अभिनंदन केल.
तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणती मदत हवी असल्यास आपण निश्चित करू आणि हा खरेदी-विक्री संघ उज्वल यश निर्माण करो आणि येथील शेतकऱ्यांना हक्काचा संघ निर्माण करा पक्ष राजकारण विरहित काम करा असेही नाईक यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.यावेळी श्री लोंढे यांनी निश्चितपणे शेतकऱ्यांच्या हितासाठी तुमचे सहकार्य आणि मदत घेऊ असेही स्पष्ट केले.
यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत मराठी भाषा अध्यापक संघाचे भरत गावडे सहसचिव राजू तावडे खजिनदार डॉक्टर दीपक तुपकर रामदास पारकर आधी उपस्थित होते.
