जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी संघटना अध्यक्षपदीं दयानंद गवस

पुढील पाच वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड

⚡देवगड ता.२४-: प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घे आपण निवृत्त होतो तेव्हा आपल्याकडे आपले आरोग्यकडे देण्यासाठी पुरेसा वेळ आहे यापुढे सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार सर्वांनी आपल्याला सहकार्य करावे सिंधुदुर्ग जिल्हा निवृत्त पोलिस अधिकारी आणि कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्षपदी दयानंद गवस यांची निवड झाल्यानंतर यांनी निवृत्त पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांना मार्गदर्शन केले.


सिंधुदुर्ग जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असोसिएशनची सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक २३/०१/२०२३ रोजी श्री साई माऊली मंगल कार्यालय कसाल बालमवाडी येथे संघटनेचे अध्यक्ष अर्जुन राणे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. सदर सभेमध्ये मागील वर्षभराचा आढावा कार्यवाह अनिरुद्ध गावडे यांनी सादर केला. यानंतर कार्यकारणीचा ५ वर्षेचा कार्यकाळ संपल्याने पुढील ५ वर्षांकरिता कार्यकारिणी निवडण्यात करण्यात आली.
अध्यक्ष. दयानंद दत्ताराम गवस, सेवानिवृत्त (डीवायएसपी)
उपाध्यक्ष. सुरेंद्र सिताराम सकपाळ विजय हरि कदम,गोविंद वासुदेव वारंग, यशवंत शंकर डींगणेकर सचिव अनिरुद्ध गंगाराम गावडे सहसचिव सुरेश गुणाजी वारंग महादेव रघुनाथ जाधव खजिनदार. उमाकांत राजाराम
पालव सदस्य रमेश कृष्णा झमने, जयशंकर राजाराम धुरी, लक्ष्मण नारायण गवस , एकनाथ मुरलीधर मुसळे, सल्लागार अर्जुन शंकर राणे नविन अध्यक्षासहीत कार्यकारिणीला माजी अध्यक्ष अर्जुन राणे यांनी शुभेच्छा दिल्या. नविन अध्यक्षांनी मार्च १९ /०३/२०२३ रोजी सर्व सभासदांसाठी सकाळच्या सत्रात आरोग्य शिबिर व दुपारनंतर गेट टुगेदर कार्यक्रम आयोजित केला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुरेंद्र सकपाळ यांनी मानले.

You cannot copy content of this page