खरेदीवर मिळणार विशेष सवलत : एक्स्चेंज ऑफर सुरू
⚡सावंतवाडी ता.२५-: प्रजासत्ताक दिनानिमित्त खास आपल्या ग्राहकांसाठी सावंतवाडीतील माने सुपर बाजार मध्ये ग्राहकांना चौफेर फायदा व अनेक साहित्य आणि तेही सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे. प्रत्येक वस्तूवर सूट असल्याने ग्राहकांनी याचा फायदा करून घ्यावा असे आवाहन सावंतवाडी शहरातील माने सुपर बाजार कडून करण्यात आले आहे.
ग्राहकांना प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व प्रकारच्या वस्तूंच्या खरेदीवर 10% ते 50 % पर्यंत भव्य सूट 26 जानेवारी रोजी मिळणार आहे. नामांकित कंपन्यांचे प्रेशर कुकर, गॅस शेगड्या, कुक वेअर, नॉनस्टिक, इंडक्शन, मिक्सर व ग्राईन्डर, वाॅटर प्युरिफायर, राईस कूकर, मॅजिक माॅप तसेच स्टील, तांबा, अॅल्युमिनियम, प्लास्टिक, गॅल्वहनाईजची भांडी याशिवाय थर्मास, हाॅटपाॅट, थंड आणि गरम पाणी राहणार अशा बॉटल तसेच सर्व प्रकारच्या गिफ्ट वस्तू खास ऑफिसकरीता टेबल, कपाट, खुर्च्या तसेच सर्वप्रकारचे फर्निचरवर ग्राहकांना सूट मिळणार आहे.
विशेष म्हणजे येणाऱ्या ग्राहकांसाठी खास एक्स्चेंज ऑफरही ठेवण्यात आली आहे. यात मिक्सर, कुकर, गॅस शेगडी यांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नामांकित कंपन्यांची उत्पादने उपलब्ध आहेत. यात Hawkins, Prestige, Godrej, Bajaj, Milton, V. guard, Racold, Orient, Boss, Aquaguard, Luminous, Pigeon, Anjali, Nirlep, Cello, Hawkins Cooker and Cookware यांचा समावेश आहे.
माने सुपर बाजार म्हणजे ग्राहकांसाठी बनत असल्याने सावंतवाडी शहरातील श्री राम वाचन मंदिर शेजारी असलेल्या या बाजाराला एकदा भेट द्याच असे आवाहन माने सुपर बाजार तर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9422633433 येथे संपर्क साधावा.
