बाळकृष्णच्या “नॅचरल आईस्क्रिम पार्लर” चा आज उद्घाटन सोहळा

वेगळी चव, नवा थाट आणि खास मेनू : फळांची चाखायला मिळणार आईस्क्रिमच्या माध्यमातून

⚡सावंतवाडी ता.२५-: निरनिराळ्या प्रकारच्या फळांची चव ग्राहकांना चाखायला मिळावी म्हणून सावंतवाडी येथील बाळकृष्ण कोल्ड्रिंक घेऊन आला आहे स्पेशल नॅचरल मेनू असलेल्या आईस्क्रिमचे पार्लर. आज दि.25 जानेवारी रोजी गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर सावंतवाडी येथील नेवगी बंधूच्या माध्यमातून शहरातील चिटणीस नाका येथे हे पार्लर सुरू होणार आहे.


बाळकृष्णच्या “नॅचरल आईस्क्रिम पार्लर” मध्ये चिकू, गुलकंद, रोस्टेड ऑलमंड, सिताफळ, ओरिओ आदी फ्लेवरचे आईस्क्रिम उपलब्ध होणार आहे. बाळकृष्ण कोल्ड्रिंकच्या कोलगाव येथील कंपनीत हे आईस्क्रिम तयार केले जाणार आहे. पर्यटकांसह सावंतवाडीकरांना खर्‍या फळापासून तयार करण्यात येणारे हे आईस्क्रिम नक्कीच ग्राहकांच्या पसंती पडतील, असा विश्वास या फर्मच्या संचालिका शांता नेवगी यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान उद्या होणार्‍या शुभारंभाच्या कार्यक्रमाला ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन नेवगी कुंटूबियांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page