कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी केली रस्त्याची पाहणी
⚡कणकवली ता.२३-: फोंडाघाट ते घोणसरी रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरण व गटाराच्या दुरुस्तीबाबत विद्यानगर ग्रामस्थांच्यावतीने येथील पत्रकार संजय सावंत यांनी दिलेल्या उपोषण इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या पालकमंत्री कार्यालयाने तातडीने दखल घेतल्याने बांधकामचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी रात्री सात वाजता तातडीने भेट देत रस्त्याची पाहणी केली
फोंडाघाट घोणसरी बोळपासून सुमारे 1500 मीटर पर्यंतच्या रस्त्यावर मागील वीस वर्षात कोणत्याही प्रकारचे खडीकरण डांबरीकरण व दुरुस्ती न झाल्याने येथील रस्त्याची दुरावस्था झालेली होती या पार्श्वभूमीवर येथील ग्रामस्थांनी एकत्र येत कणकवली बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कार्यालयाला निवेदन देत येत्या 6 फेब्रुवारी पर्यंत रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा संजय सावंत यांच्याकडून देण्यात आला होता
दरम्यान याची प्रत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग ,जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांना पाठविल्यानंतर तातडीने याची दखल घेत बांधकाम विभागाचे अभियंता सर्वगोड यांना कळविण्यात आले. त्याप्रमाणे नेहमीच कामांमध्ये कार्यतत्पर असणारे कणकवली बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनीही आपली कामामध्ये तत्परता दाखवत मुंबई वरून आंदोलन कर्ते संजय सावंत यांच्याशी मोबाईल वरून तातडीने संपर्क साधत आपल्या मागणीनुसार तातडीने काम सुरु करण्याच्ये आश्वासन देत आज विद्यानगर येथील रहिवाशी आंदोलनकर्त्यांशी भेट घेत रस्त्याची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला तातडीने बोलावून काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना देताना चांगले करण्याबाबत सर्वगोड यांच्याकडून सांगण्यात आले.
दरम्यान यावेळी येथील नागरिक बाळा गव्हाणकर, रमेश राणे, गणेश गोसावी ,शशांक गाड, आकाश पारकर, शेखर पेडणेकर आदी उपस्थित होते.
