मालवण देऊळवाडा युवासेना उपशहर युवा अधिकारीपदी उमेश चव्हाण

⚡मालवण ता.२१-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना सचिव खा. विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख आ. वैभव नाईक यांच्या शिफारशीने मालवण शहरातील देऊळवाडा युवासेना उपशहर युवा अधिकारीपदी उमेश अरविंद चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी त्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.

यावेळी युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, पंकज साधये, शहरप्रमुख बाबी जोगी, यशवंत गावकर, राजू परब, तपस्वी मयेकर, मनोज मोंडकर, सिद्धेश मांजरेकर, सुहास वालावलकर, पॉली गिरकर, दत्ता पोईपकर, करण खडपे, निनाक्षी मेथर, बाबू वाघ आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page