आचरा भंडारवाडी येथे २६ जानेवारीपासून क्रिकेट स्पर्धा

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना अनुक्रमे २० हजार ४१, १० हजार ४१ रुपये आणि आकर्षक चषक तर तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या संघांना अनुक्रमे ३ हजार ४१ रुपये आणि चषक तसेच वैयक्तिक पारितोषिकेही दिली जाणार आहेत. संघ नावनोंदणी २३ जानेवारीपर्यंत अमर गावकर (9403343319), निरु पडवळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील सामने साखळी लीग पद्धतीने खेळविले जाणार असून यात प्रथम नावनोंदणी करणाऱ्या १६ संघांना स्पर्धेत प्राधान्य दिले जाणार आहे. ही स्पर्धा भंडारवाडी येथील श्री देव वाडोळी क्रीडांगण येथे खेळवली जाणार आहे.

⚡मालवण ता.२०-: आचरा भंडारवाडी येथे श्री देव वाडोळी क्रीडा मंडळाच्या वतीने खुली टेनिसबॉल (लीग पद्धती) क्रिकेट स्पर्धा २६ ते ३० जानेवारी या कालावधी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे ४१ वे वर्ष आहे.

You cannot copy content of this page