२५ जानेवारीला धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम
⚡कणकवली ता.२०-: असलदे उगवतीवाडी येथे ब्राम्हणदेव सेवा मंडळाच्या वतीने श्री गणेश जयंती उत्सव व श्री सत्यनारायणाची महापुजा प्रतिवर्षाप्रमाणे बुधवार दि. २५ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केली आहे.यानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आली आहे.
त्यानिमित्त सकाळी ९.३० ते १० वाजता श्री गणेश पुजन, सकाळी १० वाजता श्री चरणी सामुहिक अभिषेक, सकाळी १०.३० ते ११ वाजता श्री सत्यनारायणाची महापुजा,सकाळी ११.३० वा.महाआरती,दुपारी १.०० ते ३.०० वा. भक्तांसाठी महाप्रसाद, दुपारी ३.०० ते ४.०० वा. महिलांसाठी हळदीकुंकु समारंभ,सायं. ४.०० ते ७.०० वा.महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा,सायं. ७.०० ते ८.०० वा.सांस्कृतिक कार्यक्रम, रात्रौ १०.०० वा.संगीत, दिंडी, वारकरी भजने होणार आहेत ,तरी सर्व गणेश भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन ब्राम्हणदेव सेवा मंडळ, असलदे उगवतीवाडी यांनी केले आहे.
