‘पिकोलो’ २६ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार

अभिनेता प्रणव रावराणे आणि अभिनेत्री अश्विनी कासार मध्यवर्ती भूमिकेत दिसणार

⚡कणकवली ता.२०-:
मनोरंजनाची चौकट न मोडताही आशयपूर्ण आणि जीवनाशी जवळीक साधणारे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताहेत. ‘पिकोलो’ या आगामी मराठी चित्रपटाच्या ‘संगीतमय’ चित्रचौकटीतून एका कलावंताच्या भावविश्वाचा प्रवास सुरेखरित्या उलगडण्यात आला आहे. येत्या २६ जानेवारील ‘पिकोलो’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जगण्याची प्रेरणा देणारा आशय, सुंदर कथा, अभिनयाने मोहून टाकणारे निरागस चेहरे आणि त्याला सुश्राव्य संगीताची जोड या सगळ्याचा अविस्मरणीय अनुभव म्हणजे ‘पिकोलो’ चित्रपट असल्याची माहिती फोर्टिगो मोशन पिक्चर प्रा. लि प्रस्तुत दिग्दर्शित अभिजीत मोहन वारंग आणि चित्रपटाचे निर्माते राजेश मुद्दापूर यांनी दिली.

‘पिकोलो’ संगीतप्रेमी कलावंताची गोष्ट आहे. संगीताच्या साथीने जगण्याची नवी उमेद निर्माण करणारा हा कलावंत संगीतसाधनेत येणाऱ्या अडथळ्यांवर मात करीत आपली कला कशी जिवंत ठेवतो? व त्यासाठी त्याला कोण आणि कशी मदत करतो? है ‘पिकोलो’ मध्ये पहायला मिळणार आहे. आनंदाने कसे जगावे याचा मूलमंत्र देणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेले प्रेमीयुगुल जगण्याच्या संघर्षावर संगीताची फुंकर घालून त्यातून कसा मार्ग काढतात? हे पहाणं रंजक ठरणार आहे,असेही
अभिजीत मोहन वारंग यांनी सांगितले.या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच श्री क्षेत्र शिर्डी येथे साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आले. प्रत्येकालाच आयुष्यात काही ठोस असे ईप्सित साध्य करायचे असते त्यात अनेक अडथळे येतात, त्यावर मात करून पुढे जायचे असते. या चित्रपटातही हा संघर्ष आहे.

अभिनेता प्रणव रावराणे आणि अभिनेत्री अश्विनी कासार मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून या दोघांसोबत ‘पिकोलो’ चित्रपटात किशोर चौघुले, अभय खडपकर, दीक्षा पुरळकर, नमिता गावकर, पद्मा वेंगुर्लेकर, विश्वजीत पालव, मिलिंद गुरव, हर्षद जाधव, रघु जगताप, रोहन जाधव, हर्षद राऊळ, शुभम सुतार, हर्षद परब, विद्याधर कार्लेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा प्रमोद शेलार यांची आहे. छायाचित्रण कार्तिक परमार तर संकलन पराग सावंत यांचे आहे. संगीत आणि ध्वनीरचना आनंद लुंकड यांची असून कलादिग्दर्शनाची जबाबदारी नरेंद्र भगत यांनी सांभाळली आहे. असोशिएट प्रोड्युसर सागर म्हात्रे तर कार्यकारी निर्माते राजू आर. के. झेंडे आहेत. येत्या २६ जानेवारीला ‘पिकोलो’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे,असे श्री.वारंग यांनी सांगितले.

फोटो
कणकवली येथे ‘पिकोलो’ चित्रपटाची माहिती देताना दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग सोबत अभिनेता प्रणव रावराणे,अभिनेत्री अश्विनी कासार,
दीक्षा पुरळकर, नमिता गावकर, पद्मा वेंगुर्लेकर, विश्वजीत पालव, मिलिंद गुरव, हर्षद जाधव आदी(छाया:प्रथमेश जाधव, कणकवली)

You cannot copy content of this page