नेहा कष्टे ठरल्या पैठणीच्या मानकरी

सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा चलवाडी आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद

⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. निलिमा परशुराम चलवाडी यांच्या माध्यमातून हळदीकुंकू कार्यक्रमानिमित्त घेण्यात आलेल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यामध्ये सौ. नेहा कष्टे या “पैठणी”च्या मानकरी ठरल्या.

तर द्वितीय क्रमांकाच्या मानकरी रसिका आईर ठरला आहेत. हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त सौ. चलवाडी यांनी खास महिलांसाठी भटवाडी येथील धनश्री मंगल कार्यालयात श्री नागेश नेमळेकर यांचा “खेळ पैठणीचा” हा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाला महिला वर्गणी मोठा प्रतिसाद दिला अनेक महिलांनी खेळात सहभाग दर्शविला होता. यामध्ये सौ.कष्टे या विजयी होत “पैठणी”च्या मानकरी ठरल्या.

You cannot copy content of this page